इतिहास

जगदगुरु पलसिध्द महाराज

    लक्ष्मण  महाराजांनी ज्या मठात वास्तव्य करून विपुल वाड:मयनिर्मिती केली आणि ज्या मठाधीशाचे शिष्यत्व त्यांनी पत्करले तो साखरखेर्डा (ता.सिंदखेडराजा,जि.बुलढाणा), येथील जगतगुरु पलसिद्ध बृहन्मठ हा अत्यंत प्राचीन आहे. मठाचे बांधकाम अनेक शतकांपुर्वीचे आहे. हे मठ पाहताक्षणी लक्षात येते. मूळ मठ हा अत्यंत अभेद्य,स्वंपदापासून सुरक्षित आहे. असा बांधलेला असून त्यातुन पुढे गेल्यावर आतील भव्य,प्राचीन मठ दृष्टीस पडतो. अकराव्या शतकात पलसिद्ध महाराजांनी येथील अरण्यात- खेटकवनात पळसाचा वृक्षाखाली वास्तव्य केले, अशी कथा आहे.त्यांनी शके ९८० (इ.स.१०५८) मध्ये संजीवन समाधी घेतली. त्यांच्या सिद्धलिंग नामक शिष्याने आपल्या सद्गुरूच्या पादुका स्थापन करून मूळ मठ बांधला. त्यानंतर पुढील काही शतकात मठाचा विस्तार होत गेला.
    मूळ मठात जेथे पलसिद्धांची मूर्ती स्थापन केलेली आहे त्या मंदिराचे दार चांदीने मढविलेले असून त्याच्या वरच्या भागावर     ‘श्रीमज्जगतगुरुपरमहंसमरूळाचार्यावर्यश्रीमद्भूरुद्रपळसिद्स्वामीनप्रसीदश्रीमन्नूपशा.शके ९८०’ असा मजकूर कोरलेला आहे.
उप्रोलीखीत मजकुरात श्री.पलसिद्धाना जगतगुरु,परमहंस,मरूळाचार्या,भूरुद अशी चार विशेषणे देऊन त्यांचे श्रेष्ठत्व गर्जून सागितले आहे..परमहंस ही अध्यात्मक्षेत्रातील एक अवस्था मानली जाते.भू-रुद्र म्हणजे भूलोकावरविहार करणारा रुद्र.कोठल्याही साक्षात्कारी पुरुषाला आणि शिवयोग्याला ही दोन विशेषणे दिली जातात.परंतु ‘जगतगुरु’ आणि ‘मरूळाचार्या’ या दोन संज्ञा मात्र सामान्य नसून पलसिद्धांचे मूळ सांगणाऱ्या आहेत.रंभापुरी,उज्जयिनी,केदार,श्रीशैल आणि काशी अशी विरर्शैवाची पंचापिठे असून’ त्या पिठाचार्याना ‘जगतगुरु पंचाचय’ असे संबोधिले जाते.कर्नाटकात बोळेहुन्नूर(जि.चिकमगलुर) येथे रंभापुरी पीठ असून त्याला ‘वीरसिहासन’ असे म्हणतात.कर्नाटकात उज्जयिनी (ता.कुडलागी, जि.बेळ्ळारी) येथील पिठास ‘सद्धर्मसिहासन’ अशी संज्ञा आहे. उत्तरप्रदेशात उमीमठ(जि.चमोली) येथे केदारपीठ असून त्याला वैराग्यसिहांसन असे संबोधिले जाते.

आंध्रप्रदेशात श्रीशैल(ता.आत्मकुर जि.कर्नुल) येथील पिठास सूर्यसिहांसन असे म्हटले जाते. आणि उत्तरप्रदेशात वाराणसी येथील जंगमवाडी मठातील पीठ’ ज्ञानसिहांसन’ या नावाने ओळखले जाते. या पीठाचे शाखा मठ सर्वत्र विखुरलेले आहेत.साखरखेर्डा येथील पलसिद्ध बृहन्मठ हा उजायीनी पिठाचा शाखामठ आहे.उज्जयिनी पिठाच्या मूळ आचार्याने नाव मारूळाराध्य असे होते.या पीठपरंपरेत मारूळसिद्ध ,मरूळाचार्य,मरूळाराध्य या नावाचे जगतगुरु होऊन गेले.उज्जयिनी जगतगुरुंच्या हाती जो दंड असतो तो पलाशवृक्षाचा म्हणजे पळसाच्या झाडाचा असतो.

श्री.पलसिद्धांचे मूळ स्पष्ट व्हावे यासाठी वरील माहिती दिली आहे. पलसिद्धांचा निवास पलाशवृक्षाखाली होता आणि त्यांनी पलाशवृक्षाखालीच समाधी घेतली,असे त्यांचा चरित्रात नमूद आहे.पालाशवृक्षाविषयाचेप्रेम पलसिद्धांच्या मनात कसे जागे झाले? आणि चांदीचा पत्र्यावरील मजकुरात पलसिद्धांना ‘जगदगुरु ’ व ‘मरूळाचार्या ‘ही विशेषण का दिली?पलसिद्ध हे उज्जयिनीच्या सद्धर्मपीठाचे जगतगुरु असून त्यांनी धर्म प्रचारासाठी भारतभर भ्रमंती केली आणि शेवटी खेटकवनात संजीवन समाधी घेतली.असाच याचा अर्थ होतो.याला आणखी एक बलवत्तर प्रमाण’ सापडले आहे.विद्यमान काशी जगतगुरु श्री.१००८ प’.पु.डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ‘वीरशैव’ परंपरे या कन्नड ग्रंथाचा अनुवाद डॉ.चंद्रशेखर कपाळे,गुलबर्गा यांनी केली असून तो’वीरशैव’ पंचापीठ : परंपरा आणि कार्य या नावाने प्रकाशित झाला आहे.या ग्रंथात पृष्ठ ३३ ते ३७ वर उज्जयिनी सद्धर्मपिठाच्या जगतगुरुंची नामावली दिली आहे.या नामावलीत ६० क्रमांकावर ‘श्री.जगदगुरु पलसिद्धेश्वर शिवाचार्य भगवद्पाद ‘ असे नाव आले असून हे नाव त्या आधी आणि त्यानंतर च्या नामावलीत पुन्हा आलेले नाही.यावरून दोन गोष्टी सिध्द होतात..(१)पलसिद्ध हे उज्जयिनी पीठाचे जगदगुरु होते.(२) ते धर्म प्रचारासाठी बाहेर पडल्यानंतर पुन्हा उज्जयिनी पिठात परतले नाही.परतले असते तर नूतन पिठाधीशाना पुर्वापिठाधिशांची नावे देण्याच्या प्रथेमुळे पुढीलकाही पीठाधीशांना तरी ‘पलसिद्धेश्वर शिवाचार्य’असे नाव मिळाले असते. ते ज्या अर्थी मिळाले नाही त्याअर्थी जगतगुरु पलसिद्धेश्वर मठात परतले नाहीत व त्यांनी खेटकवनात समाधी घेतली आणि त्यांच्या सिद्धलिंग नामक शिष्याने मठ बांधून त्यांच्या स्मृतर्थ एक नवी परंपरा-पलसिद्ध परंपरा तेथे चालू केली.

साखरखेर्डा येथील मठाचे मूळपुरुष पलसिद्ध हे उज्जयनी पीठाचे साठावे जगद्गुरु  होते.आता उज्जयिनी पिठावर १११ वे जगतगुरु आहेत.पिढ्यांचा हीशेब केला आणि सरासरी एका पिढीला २० वर्षे धरली तर ६० व्या जगतगुरूंचा काळ एकहजार वर्षापूर्वीचा निघतो,तो पलसिद्धांचा काळाशी बरोबर जुळतो.लक्ष्मन महाराजांनी ‘श्रीसिद्धेश्वरामहात्म’ या नावाचे ओवीबद्ध पलसिद्ध चरित्र रचले आहे.लक्ष्मन महाराजांच्या समोर काही प्रमाण ग्रंथ असावेत ,जे आज आपल्यासमोर नाहीत.लक्ष्मन महाराज म्हणतात

उज्जयिनी ते सिंहासन | तेथे तुमासी अवतरण |
कारावया पालन | भक्तजनांचे हे देवा ||१.१०||
उज्जयिनी स्थान सोडून | आलासी तू बीदरासी ||१.३५||

श्री.पलसिद्ध हे उज्जयिनी सिंहासनाधीपती होते,याविषयी लक्ष्मण महाराजांचा मनात तीळमात्र संदेह नव्हता,हे वरील ओव्यांवरून लक्षात येयील.म्हणुन त्यांनी आपल्या भावविश्वाला पलसिद्धाना जगदगुरूंच्या रुपात पहिले.

 रत्नजडीत सिंहासन | वरी बैसले आपण ||१||
मूर्ती दिव्यं ती पहिली | नाना अलंकारे शोभली ||२||
(श्री.लक्ष्मण गाथा अभंग क्र.२४८०)

चांदीच्या पत्र्यावरील लेख ,उज्ज्यीनीत पीठपरंपरेतील पलसिद्धेश्वर जगदगुरूंचा उल्लेख आणि लक्ष्मण महाराजांच्या वाड:मयातील प्रमाणे यांचा आधारे पलसिद्ध हे उज्जयिनी पीठाचे जगदगुरु होते,याबद्दल कोणाचाही मनात संदेह राहू नयेसर्वाधिक वाड:मय निर्मिती करणारे लक्ष्मन महाराज अशा पलसिद्ध परंपरेचे अनुयायी होते.